Sunday 26 June 2016

चिरकुट चारोळ्या.

1) देवावरची श्रद्धा
     जशी वाऱ्या बरोबर स्पर्धा
     पळत पळत घालतो नमस्कार
    देव पण सोडत असेल सुस्कार.

2) सभोवतार पहिले मी
     Concrete चे जंगल
     पर्यावरणाचा ऱ्हास हा
     तरी म्हणतात शुभ मंगल.

3) तहान लागली
     भविष्याची सर्वा
     म मुक्या जीवाची
     कोण करेल पर्वा.

4) खूपच विचित्र वाटतं एकटेपण
     चाहुबाजूला असून सर्वजण
     वाटतं मनाला
     हक्काच अस्सं पाहिजे एकजण.

5) कथा माणसांच्या
     सांगायच्या किती?
     घरोघरी मातीच्या चुली
     अन दुभंगलेल्या भिंती..

निवडणुका!

निवडणुकांचा चढला रंग
जो तो प्रचारात दंग,

एकमेकांवर आरोपांच्या फ़ैरी
सक्खे भाऊ आता वैरी,

यांच्या आश्वासनांचा आला पूर
बस्स झालं ! बदला नूर..

त्याच त्याच पणाने वैताग आला
वेळ आली, आता बदला!

मतदार राजा जागा हो!
मतदान करून दे खो!

भरलाय यांच्या पापाचा सारा
उठा आता! मतदान करा!

Wednesday 22 June 2016

मुका

मुक्या प्राण्याला बोलता यावे
त्यांनी सुद्धा खाण्यासाठी अन्न मागावे,

मुक्या प्राण्याला बोलता यावे
त्यांनी सुद्धा कडाक्याच्या थंडीत थोडी ऊब मागावे,

मुक्या प्राण्याला बोलता यावे
त्यांनी सुद्धा पिंजऱ्यातून मुक्ती मागावे,

मुक्या प्राण्याला बोलता यावे
त्यांनी सुद्धा प्रेमाचा एक स्पर्श मागावे,

या प्राण्याची बंद वाचा
त्यांची अन्नान दशा..
दगडांच्या देशी वावरे
देव हा कसा?