Saturday 26 November 2016

आजूबाजूचे भन्नाट माणसें..!!

आजूबाजूचे भन्नाट माणसं : भाग १

बालाजी जाधव..
हा माझा मित्र. बालाजी. एक भन्नाट अवलिया! या पठयाने Food technology मध्ये M. Tech केलंय.
अता याने M. Tech केलंय म्हणून तुम्हांला वाटतं असेल की हा कुठेतरी 9 ते 7 अश्या ऑफिस च्या रोजच्या वाऱ्या करतं असेल?
पण नाही! हा थेट शेतांत आला! आणी शेतीला करिअर म्हणून निवडलं!
मला जेंव्हा पहिल्यांदा कळालं तेंव्हा माझी प्रतिक्रिया, "WTF..!!😱" अशीच काहीतरी होती.

पण त्याच्याशी झालेल्या गप्पा-गप्पा तून तो बोलला कि, "अरे मला आवडतात या सगळ्या गोष्टी, माहितेय का! मी सकाळी लवकर उठून शेतांत जातो, गोठा साफ करतो, स्वतः हाताने शेण सुद्धा काढतो! जनावरांना पाणी पाजवतो आणि चारा पण टाकतो! हे सगळं करताना मला अज्जिबात लाज वाटतं नाही कारण मला हे सगळं मना पासून आवडतं! निसर्ग..निसर्ग जे म्हणतात ते इथंच आहे. या शेतात, या रानांत, बघ जरा आजूबाजूला, इथं पशु, पक्षी, जनावरं, मोकळी हवा यांचा वावर आहे. हे सगळं त्या शहरात मिळणार नाही! तरी गावातील लोकं मला म्हणतात, 'एवढं शिकून कामुन शेणात हात घालतं बसलाय?' 'जॉब कर..' तरी मी ऐकत नाही कारण हे सगळं मला आवडतं म्हणून मी इथे आहे."

मी कुठंतरी वाचलं होतं, "जे तुम्हांला मनापासून आवडतं ते काम तुम्ही करतं असाल, तर ते काम - काम राहतं नाही."

"तमाशा" पिक्चर मधल्या सारखं, "लकिर का फकीर" न होता, मनासारखे आयुष्य जगण्यासाठी धडपडणाऱ्या या अवलीयाला माझा मानाचा मुजरा..

No comments:

Post a Comment