Sunday, 29 January 2017

मोकळा श्वास

मी भटकतो आहे रानात
माझ्या घराच्या अंगणात,
पण मेंदू मात्र
घुटमळतोय चौकटीच्या आत.

बराच प्रयन्त करून पहिला
मोकळीक काही त्याला मिळू देत नाहीत,
Criticism करून करून
त्याला जगू देत नाहीत.

बाहेरचे लोकं criticize करत असतील
तर गोष्ट मात्र वेगळी,
पण घरचीच हवा प्रदूषित झालीये
अडचण थोडी निराळी.

शरीर जरी घेऊन फिरत असलो
तरी मेंदूवर हल्ला होताच आहे,
रोजच्या निंदा नालासतीने
थेंबे थेंबे श्वास सोडत आहे.

No comments:

Post a Comment