ट्रेकिंग म्हंटल कि
“नाही” हा शब्द माझ्याकडे नाहीच! नुकताच पुण्यात पोहचलो होतो. संध्याकाळचे पाच
वाजले असतील, मी किर्ण्याला फोन लावला. सांगितलं, आलोय पुण्यात म्हणून. थेट
आमंत्रण भेटलं. रायलिंग पठारावर जायचं का? अस विचारत होता. चला! मीही लगेच तयार
झालो. असहि, पुण्यात आलो आणि ट्रेक ला नाय गेलो म्हणजे विनासाखरेचा चहा असल्यागत
वाटत.
मी सहजच पुण्यात आलो
होतो त्यामुळे नाईट ट्रेकसाठी लागणार साहित्य माझ्याजवळ नव्हत. पण पठ्या सर्व तयारी नुसार आला होता.
रात्री दहा वाजता,
मी, किरण्या, प्रणव पाटील, त्याचे मामा, त्यांचा मुलगा व मामा चे मित्र असा
गोतावळा वेल्हे च्या कार ने दिशेने निघाला. मामा ने बराच काळ बेळगाव मध्ये
घालवलेला. त्याचं जन्मस्थानच ते! त्यामुळे ते बोलत असताना, वाक्य संपल्यावर
शेवटच्या शब्दावर जोर देऊन बोलायचे. वाक्य संपल्यावर, शेवटचा शब्द सात वेळा कानात
घुमत असल्यासारख वाटायचं.
पुण्याच्या बाहेर
टोल नाक्यावर आम्हाला मोठ मोठ्या प्रवासी वोल्वो गाड्या दिसल्या तसा मामा भूतकाळात
गेला.
म्हणे, या गाड्याने कधी प्रवास केला तू?
म्हंटल, नाही.
मी केला. लय फास्ट
असतात या! थोडा वेळ झोपलं तर कर्णाटकात उतरवलं यांनी! एकदम भारी! गाडीत बसल्यावर
काही जाणवत नाही. खड्डे, स्पीड ब्रेकर, काहीच नाही. एकदम आरामदायक. कितीचा स्पीड
आहे कळत नाही.
पण माहितीये..
विचारलं, काय?
जर या गाडीचा
अक्सिडेंट झाला तर..
म्हंटल, नक्कीच
वाचणार..
म्हणे, नाही! सगळेच
मरणार!
च्यायला मामच्या!
याच्याकडून स्तुती ऐकून, या गाडीतून प्रवास करण्याच्या मोह झाला होता, क्षणात
दातात खडा आल्यासारख वाटलं. विषयावर काही बोललो नाही परत.
टोल नका क्रोस करून
गाडी वेल्हे च्या दिशेने निघाली. चांदण्यांनी भरलेल्या ढगात अर्धा चंद्र सोबतीला
होता. रस्त्यावर आमची गाडी सोडली तर चिटपाखरू हि न्हवत.
मी पहिल्यांदाच या
रूट ला आलो होतो. हा भाग माझ्यासाठी नवीन होता पण पोरांनी या आधी इथे i घातली
होती म्हणे. त्यामुळे गाडी सुसाट होती.
घाट माथ्यावर मात्र थोडी फाटलीच. चढ इतका
तीव्र होता कि गाडी चढणार का? अशी शंका आलेली पण मामा ऑटोमोबाई इंजिनीअर होता व
कित्येक वर्ष त्या क्षेत्रात कामाला होता. अनुभव कामी आला.
सिंगापूर गावाच्या
फाट्यावरून गाडी उजवीकडे घेतली. मोहरी गाव म्हणजे रायलिंग पठाराला जायचं प्रवेश
द्वार! त्या फाट्यावर लागलेल्या चढावर गाडीच्या पाठीमागच्या टायरखाली दगड टाकत
टाकत गाडी वर चढवली.
मोहरी गावात गाडी
लावली. कारची डिक्की उघडून भाऊने सामान काढायला सुरवात केली. दोन टेंट, चटई, तीन
रग, एक स्लिपिंग bag, दोन कॉलेज च्या bag, अन एक घरच सामान आणायची पिशवी!
“ट्रेक ला आला का
बाजारात आला बे!”
म्हणे, नवा प्रयोग.
त्या पिशवीला
बाहुबली स्टाईल मध्ये खांद्यावर घेऊन ट्रेक ला सुरवात झाली. अंधाऱ्या रात्रीत
टोर्च च्या प्रकाशात पावला समोर पाउल पढत होत. तिथे बऱ्याच पाऊल वाटा दिसत होत्या.
यातल्या कोणत्या
जाणार? मी विचारलं.
कोणतीही धर,
पठारावरच घेऊन जाणार. भाऊचा रिप्लाय.
निर्धास्त निघालो.
खोड्या करत. मध्यरात्र उलटून
गेली असल्यामुळे निरव शांतता पसरली होती. फक्त आमच्या चालण्याचा व बोलण्याचा आवाज
येत होता. बाकी चिडीचूप शांतता. एका ठिकाणी वाटेमध्ये अडवा लाकडाचा ओंडका आला. भाऊ
सुरु!
कोणी टाकला ये ओंडका!
भूत बित हाय कि काय! ये भूत! भूत! ये भूत!
नंतर स्वतःच हसायला
लागला.
किरण्याच्या अंगातला खोडीलपणा मला माहित होता म्हणून मी दुर्लक्ष केलं व
ओंडका ओलांडून पुढे सरकलो.
असा बराच वेळ चालत
होतो. बाजाराची पिशवी आता माझ्याकडे आली होती. टोर्च च्या प्रकाशात अंधाऱ्या रात्री
दगड धोंडे, चढ उतार, यातून प्रवास पुढे चालू होता. भाऊंनी तर आधीच गर्जना केली
होती, “कुठलीही वाट धरा, ती पठारावरच नेणार!”
आम्ही मिळेल त्या
वाटेने गेलो आणि फसलो.
गवतामुळे निसरडा बनलेल्या उतारावर मी, छोटा वरद, मामा,
त्यांचा मित्र असे थांबलो व हे दोघ वाट शोधायला पुढे गेले. अवघ्या काही मिनिटांत
त्या दोघांना वाट सापडली. आम्ही वाट चुकून वरच्या बाजूला आलो होता, आता खाली जाण
भाग होत पण गवतामुळे पाय घसरून पडण्याची दाट शक्यता होती त्यामुळे छोटा वरद अक्षरश
घसरगुंडी खेळत खाली आला.
पहाटे दोन नंतर कधी
तरी आम्ही पठारावर पोहचलो. सपाट जागा पाहून दोन्ही टेंट उभे केले. सहा लोकांसाठी
एकदम पेरफेक्ट! त्या पठारावरून अर्ध्या चंद्रप्रकशात दिसणारा लिंगाणा काळजात धडकी
भरवणारा होता. त्या प्रकाशात लिंगाण्याची काळकभिन्न आकृती थक्क करणारी होती. कणखर
देशा, राकट देशा, महारष्ट्र देशा! असं का म्हणतात याची प्रचीती मला अजून एकदा आली.
चांदण्यांनी
भरलेल्या आकाशाखाली, विज्ञान, श्रद्धा, अंधश्रद्धा या विषयावर गप्पा मारत मारत झोप
कधी लागली कळलंच नाही.
सकाळी सूर्योदय च्या
वेळी प्रणव ने हाक मारून उठवलं. तो बाहेर बोलावत होता. बाहेर आलो. झक्कास सूर्योदय
नजरेस पडला. लहानपणी आपण जसे निसर्ग चित्र काढायचो अगदी त्या प्रमाणे दृश्य होत!
फक्त नदी न्हवती. दोन डोंगररांगेच्या मधून सूर्य उगवत होता. त्याचा तांबूस प्रकाश
आसमंतात पसरत होता. धन्य धन्य झालं.
सगळं पंकउप केलं व परतीचा
प्रवास चालू केला. बरेच अंतर चालल्यानंतर, रात्री आडव्या आलेल्या ओंडक्या जवळ आलो.
तेंव्हा लक्षात आल कि, हा ओंडका भूता-बिता ने नाही तर कोणीतरी जाणून बुजून वाटेत
आडवा टाकला होता, जेणे करून वाट चुकू नये! पण आम्ही i घातली. लेसन इज लेसन!
मोहरी गावामध्ये बाबुराव
पेठे यांच्या घरी चहा, नाश्टा झाला व दुपारी पुणे गाठलं.
No comments:
Post a Comment