Friday, 1 June 2018

यातना

मनात साठून राहिलेल्या
गोष्टी कोणाला सांगायच्या?

माणसांच्या गर्दीतला हा एकांत
हक्काची माणसे..कधी भेटायच्या?

सगळेचं आप-आपल्या विश्वात रंग
भावना कोणासमोर व्यक्त करायच्या?

मनातल्या काळोख्या तुरुंगात कैद मी
"विचार" गोष्टी सांगतात मारयच्या..!!

का..

उजेडाचा एक किरण दिसेल का?
या काळोखातून मुक्त करेल का?

No comments:

Post a Comment